Thursday, August 6, 2009

एका छोट्याश्या घराची गच्ची...

मी आणि आणखी काही जण...

गच्चीत काही वस्तू मांडून ठेवल्यात...

ते घर आणि ती गच्ची...

बडोद्यातल्या एका जुन्या घराची आठवण करून देणारं...

अचानक जोराचा वारा नि वादळ सुरु होतं...

गच्चीत टेबलावर ठेवलेल्या वस्तू मी गोळा करायला लागते तर त्या उडून जायला लागतात

म् आम्ही सगळे घाईघाईनी आत जायला लागतोतर मी एकदम हवेत उडायला लागते...

आणि दरवाजातून आत शिरतानाच माझं बर्फात रूपांतर होऊ लागतं...

मागून सगळे ओरडतायत... 'लवकर आत जा' म्हणतायत...

पण मी हलूच शकत नाहीये...मी एक बर्फाचा ठोकळा बनत चाललीये...

टणक नि थंड ...

Wednesday, July 29, 2009

trapped!

एका मित्राला आणि मला गुंडांनी पकडलंय. मी आतल्या खोलीत झोपलीये. बाहेर येऊन बघते तर मित्राला दोरीनी छताला टांगून ठेवलंय. मी कानोसा घेते...गुंड आजूबाजूला नाहीयेत याची खात्री झाल्यावर तिथून हळूच सटकायचा विचार करतेय... आवाज न करता दरवाजा उघडते तर तो मित्र एकदम दचकतो आणि ओरडतो, "कैसी दोस्त है? छोडके जा राही है? भूख लागी है, कुछ खाने को ले आ..." मी त्याला समजावते की मी आपल्या सुटकेचाच प्रयत्न करतीये वगैरे...!

त्याच्यासाठी खायला आणायला बाहेर पडते. चढ उताराचा रस्ता... एक कार दिसते. मी कारमध्ये बसून कार चालवायला लागते. पण तिचा फार आवाज होतोय...गुंडांना ऐकू गेलं तर...? मला भीती वाटायला लागते... मग मी अजिबात आवाज न करणारी कार शोधायला लागते... थोड्या वेळानी कंटाळून परत येते... दोरी सैल करून मित्राला सोडवते... आणि आम्ही धडपडत तिथून बाहेर पडतो...

bomb blast

PMT बस मधून मी कुठेतरी चाललीये. उजवीकडे सिंहगड दिसतोय. अचानक सगळ्यांचं एका बाजूला लक्ष जातं. फटाक्यांचे stalls लागलेत. दुकानदार सामान गोळा करतायत. stalls गुंडाळताहेत. कारण बॉम्ब स्फोट होणार अशी अफवा आहे. तेवढ्यात फटाक्यांच्या stalls मध्ये आग भडकते ... आई मागच्या सीट वर बसून किंचाळतीये...

Saturday, March 7, 2009

chameleon dream

घरी काका -काकू जेवायला आलेत॰ मी त्यांच्याशी गप्पा मारायला लागते तिथे माझा मित्रही (जो त्यांचा मुलगा आहे॰!) असं गृहीत धरून॰ त्याच्या ऐवजी एक अनोळखी मुलगी कुठूनतरी उपटली आहे॰ म् मी आत येते तर तिथे तो मित्र बसलाय आधीपासूनच ! आणि जमिनीवर एक सरडा फिरतोय॰ पिवळसर हिरवट रंगाचा आणि त्यावर बारीक चौकटीची नक्षी, त्यावर लाल ठिपके॰ त्यानी नागासारखा फणा काढलाय आणि माझ्याकडे झेप घेतोय... मी ओरडते॰ बाबा बाहेर बसलाय, त्याला हाका मारते॰ त्याला सांगते आत एक सरडा आलाय॰ बाबा विचारतो, 'त्याचा रंग आवळ्यासारखा आहे का?' ... मला कळत नाही याला कसा बाहेर बसून रंग ओळखता आला...?

आणि माझी आजी सारखी हाका मारतीये, झोपेतून उठवतीये... नूपरे, उठ, चहा कर ! ...

'arti'-fact!

एक जुनाट लाकडी इमारत॰ तिथे एका मोठ्या प्रदर्शनाची तयारी चालू आहे॰
तैलचित्र करणारे एक महान कलाकार त्यांचं चित्र घेऊन येतात॰ मी ते चित्र भिंतीवर लावायचा प्रयत्न करते, पण काही केल्या जमत नाही॰ मग मी कुणालातरी सांगते तर तो पठ्ठा ते चित्र छतावरच्या एक खिळ्याला टांगतो॰
त्याच हॉल मध्ये माझा एक मित्र installation (मांडणी शिल्प) लावतो आहे॰ त्याने मांडणी शिल्प म्हणून तिथे एका लोखंडी पलंगावर गादी, ऊशी आणि पांघरूण ठेवले आहे॰
बाजूच्या एका अंधा-या खोलीमध्ये अजून एका artist नी काही छायाचित्रं मांडली आहेत॰ काही लाकडी ठोकळे ठेवलेले आहेत॰ ती स्वत: चित्र विचित्र पोशाखात बाल्कनीत विचारमग्न अवस्थेत बसली आहे॰ त्या खिडकीतून सुटून हळूच काही किरणं आत येताहेत... तेवढाच काय तो सूर्यप्रकाश॰
मग तिथे एक सामाजिक कार्यकर्त्या बाई उगवतात, त्यांनाही प्रदर्शनात काहीतरी मांडायचं असत॰ तर मी त्यांच्या शेजारी विळीवर बसून काहीतरी चिरायला लागते...

Saturday, February 14, 2009

A, B, S & ...!

एक ऑफिस सदृश जागा ... मी एका soft board वर visiting cards चिकटवतीये॰ ब्रशनी त्यावर भरपूर डिंक लावतीये, इतका की soft board वरुन त्याचे ओघळ वाहताहेत॰ ती - १ मला समजावतीये, " अगं, इथे बाहेरून येणारे जे लोक आहेत त्यांची visiting cards लावायची॰ आपलीच नव्हे! " मला मात्र त्याचं काहीच नाही। ती-२ मला डिंक वाया घालवल्या बद्दल रागावातीये॰

बाहेर जोराचा वारा अणि पाउस सुरु झालाय॰ ती-२ अणि ती-३ जाऊन कुठुनतरी दोन लाकडी शिल्पं घेउन येतात॰ त्यातलं एक गाढवाचं डोकं आहे अणि दुसरं अजून काहीतरी (काय ते मला नक्की आठवत नाही..!) ते नेवून बाल्कनी मध्ये ठेवतात तर ते भिजून खराब ! लाकूड कुजायला लागलंय॰ मग या सगळ्या पोरी गायब !

मी दमून गादीवर बसते ॰ फरशीवरच गादी टाकलीये... अचानक कुठुनतरी 'तो' उगवलाय... आम्ही गादीवर बसलोय... अणि त्या गादीखालून एकाएकी एक झुरळ बाहेर पडतं... मग अजून एक जरासं मोठं... म् त्याहून मोठं ...! काळसर ब्राउन रंगाची उडणारी मोठाली झुरळं ... ती रांग वाढतच चालली आहे... न संपणारी झुरळं ...समोरच्या कपाटाच्या दिशेनी जाणारी त्यांची रांग... गादीवर बसलेले आम्ही दोघं... आश्चर्यचकित होउन त्यांचं निरीक्षण करणारे...

Friday, February 13, 2009

Sa. Na. Ma.

सडक नाटक मंडळीँचा पथनाट्याचा प्रयोग॰ एक मोठ्या पटांगणात लोक जमलेत॰ बहुतेक सर्व पुरोगामी मंडळी आली आहेत॰
नाटकातील कलाकार प्रयोग सुरु करतात॰ मध्ये फेर धरून गाणं सुरु होतं॰ मी मात्र अजुन बाहेरच उभी आहे ॰ मी पटकन त्यांच्या बरोबर गाणं म्हणायला गोलात शिरते तर कुणीतरी मला हटकतं आणि बाहेर काढतं॰
मग नाटक सुरु होतं॰ सूत्रधार १ त्याचा संवाद म्हणतो आणि मग सूत्रधार २ ला तिचा संवाद म्हणायचा असतो॰ पण ती अडखळते, संवाद विसरते॰ अचानक सगळेच जण पूर्ण नाटकच विसरून जातात॰ कुणालाच काहीच आठवत नाही॰
एक लांबलचक शांतता ॰ ॰ ॰
सगळेजण एकदम लवून नमस्कार करतात आणि माफी मागतात॰
नाटक तिथेच थांबतं॰ ॰ ॰

Sunday, February 8, 2009

up n down

a construction site
an open elevator
up n down
down n up
people come n go
i stay there
confused
unable to decide
whether to step out
or stay in forever...!

Friday, February 6, 2009

लाल बॉक्स


एक मोठ्या सभागृहात असंख्य लोक बसलेत॰ ते ठिकाण आहे लग्नं जुळवण्याचे ठिकाण॰ वधु-वर सूचक मंडळाचा एक प्रकार॰ सभागृहाच्या एका भागात टेबलं मांडली आहेत॰ मागे छोटंसं व्यासपीठ॰ समोर खुर्च्यांवर अनेक लोक बसलेत॰ 'मुलं' आहेत बरीचशी॰

मला आणि एका मैत्रिणीला आमचे आई-बाबा तिथे घेउन गेलेत॰ आमची लग्नं ठरवायला॰ तिथे एका मोठ्या टेबलामागे एक बाई बसल्यात॰ तिथल्या मुख्य असाव्यात॰ मैत्रिण तिच्या आई-बाबांबरोबर त्या बाईंच्या समोर बसते॰ प्रत्येक व्यक्तीचा तिथे एक बॉक्स आहे ज्यामध्ये त्यांच्यासाठी योग्य अशा मुला-मुलींच्या नावाच्या चिठ्या ठेवण्यात आल्या आहेत॰ मैत्रिणीचा डबा vintage car च्या आकाराचा आहे॰ चकाकणारा लाल रंग॰ आता थोडासा रंग उडालाय॰ एका मशीन मधून तो डबा वर येतो॰ त्यातल्या तीन चिठ्या काढून त्या बाई त्यातली कसली तरी पूड त्यांच्या समोर टेबलावर ठेवलेल्या तीन ग्लास मध्ये टाकतात॰ त्यातल्या एका ग्लास मधल्या द्राव्याचं लाल जेली मध्ये रूपांतर होतं॰ त्या बाई सांगतात की याचा अर्थ लाल जेलीवाल्या चिठ्ठी वर ज्याचं नाव आहे त्याच्याशी पुढची बोलणी (!) करता येतील॰ इतर दोन मुलं आता बाद!!!

पुरोगामी आई-बापाच्या या दोन पोरींनी काय बरे करावे ?! :P

Thursday, February 5, 2009

my foot!


an open air auditorium
hundreds of dancers are going to perform in front of the royal family as a part of some festival...!
i go in ... THE queen asks me join the dancers...
i am confused!
i hesitate... she insists that i go n perform...
cut to -
am all decked up ... white saree with golden jerry border, gold jwellery, waist band n a hairdo...
i dance along with those hundreds of Mohiniattam dancers...
the queen announces at the end of the program that i am the best of the lot..!
ah ha!
i narrated this to a friend who herself is a mohiniattam dancer ... she exclaimed, 'my foot!' :P

Wednesday, February 4, 2009

why purple...?

second (or third?) world war is on..!!!
place: top floor of my school building
crowded. noisy.
people are looking for their costumes (?) and weapons...
all are fighting...shouting...cursing...
cut to -
i enter a crowded room (which used to be my classroom in school!)
n start looking for my purple robe...
cut to -
i realise that this entire episode is going to be shot by a friend of mine...
i see myself in that purple robe walking towards the camera...

they say dreams are in black n white..
then why purple...?!